🕒 1 min read
Moises Henriques : ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोईसेस हेन्रिक (Moises Henriques) आता आपल्या जन्मदेश पोर्तुगालकडून क्रिकेट (Portugal Cricket Team) खेळणार आहे. आगामी ICC T20 वर्ल्ड कप 2028 पात्रता फेरीत तो पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणार आहे.
मोईसेसचा जन्म पोर्तुगालमध्ये झाला होता. मात्र, लहानपणीच त्याचे कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आणि तिथेच त्याने क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. 2009 मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया संघाकडून (Australia Cricket) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
हेन्रिकने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये सामने खेळले आहेत. त्याने 4 कसोटी, 16 वनडे आणि 24 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, कसोटी आणि T20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी दोन अर्धशतके नोंदवली आहेत. 2021 नंतर मोईसेस ऑस्ट्रेलिया संघाचा भाग राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय संधी कमी झाल्याने आणि नव्या आव्हानाच्या शोधात त्याने पोर्तुगालकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
पोर्तुगाल सध्या 2028 T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2028) पात्रता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी पोर्तुगालची पात्रता मोहीम युरोपियन उप-प्रादेशिक पात्रता फेरीपासून सुरू होणार आहे. ICC च्या नियमानुसार मोईसेस पोर्तुगालकडून खेळण्यास पात्र ठरला आहे. पूर्ण सदस्य देशातून सहयोगी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूसाठी असलेला तीन वर्षांचा अनिवार्य कालावधी त्याने पूर्ण केला आहे.
मोईसेस हेन्रिकने IPL मध्येही आपली छाप सोडली आहे. त्याने Punjab Kings, Sunrisers Hyderabad, Royal Challengers Bengaluru, Delhi Capitals आणि Kolkata Knight Riders या संघांकडून खेळले आहे. IPL मध्ये त्याने 1000 हून अधिक धावा आणि 42 विकेट्स घेतल्या आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- SC Sub-Categorisation वरून विधानसभेत गोंधळ; मुख्यमंत्र्यांनी मांडली सरकारची बाजू
- कंपन्यांनो सावधान! POSH Act Audit अनिवार्य, उल्लंघन केल्यास मोठी कारवाई
- बिडकीनमध्ये खाकी झाली लाचार; गुन्हेगारांचे सोशलाईझिंग आणि वाळू तस्करांचे साम्राज्य, स्थानिक नेत्याच्या वरदहस्ताची इनसाईड स्टोरी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












