प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २०२६ च्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशासमोरील आव्हानांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. काही अतिमहत्त्वाकांक्षी नेते समाजविघातक शक्तींना पाठिंबा देत असल्याचे सांगत त्यांनी देशविरोधी कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. केवळ आंदोलनांतून समस्या सुटणे सोपे नसल्याचे स्पष्ट करत, देशात आणि समाजात फूट पडू न देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जागतिक परिस्थितीवर बोलताना भागवत म्हणाले की, पाश्चिमात्य जगातून आलेले एक वादळ मानवी संस्कार, सांस्कृतिक मूल्ये आणि मांगल्य नष्ट करू पाहत आहे. फ्रान्स आणि अल्बेनियासारख्या देशांमध्ये हे घडत असल्याचा दाखला त्यांनी दिला. 'रेजीम चेंज' (सत्तांतर) केल्याने परिस्थिती बदलते, हा अनेकांचा समज चुकीचा असून पूर्वीही तसे झाले नाही आणि पुढेही होणार नाही, असे ते म्हणाले. भारत प्रगत झाल्यास आपल्या हेतूंना बाधा पोहोचेल या भीतीने काही आसुरी शक्ती भारताला तोडण्यासाठी टपून बसल्या आहेत.
लोकशाहीमध्ये आंदोलने होणारच, मात्र त्यांचा उद्देश केवळ समस्या सोडवणे हाच असला पाहिजे, असे भागवत यांनी स्पष्ट केले. आंदोलनांचा उद्देश दुसराच असल्यास ते राजकीय स्वरूप घेते, ज्यामुळे समाजात शत्रूभाव वाढतो आणि त्याचा गैरफायदा देशविरोधी शक्ती घेऊ शकतात. त्यामुळे आंदोलने राज्यघटनेच्या चौकटीतच व्हावीत आणि समाजाने या आंदोलनांच्या कचाट्यात न सापडता परस्पर संवाद वाढवावा, असा सल्ला त्यांनी नेत्यांना दिला.
हिमालयाच्या पट्ट्यात आणि विशेषतः नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा संदर्भ देत भागवत यांनी विकासाच्या संकल्पनेवर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली. संपूर्ण हिमालयीन क्षेत्रात संकटांची पुनरावृत्ती होत असून, विकासाच्या नावाखाली मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती ओढवू नये, असा इशारा त्यांनी दिला.
भारताच्या एकतेवर भर देताना त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू दृष्टिकोनात विशिष्ट पूजा पद्धती, राहणीमान, खानपान किंवा सामाजिक-राजकीय विचारांचे कोणतेही बंधन नाही. सर्व भारतीयांनी आपण एक असल्याची भावना मनात जपली पाहिजे. देशाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- सत्तेचा अहंकार निर्माण होतो तेव्हा ‘गोकुळ’ होतं; उदय सामंतांचा जयकुमार गोरेंना टोला
- संजू सॅमसनने ‘जेलर २’ पाहण्यासाठी बूक केले संपूर्ण थिएटर; रजनीकांत यांच्यावरील प्रेमापोटी उचलले पाऊल
- गोकुळ दूध संघ निवडणूक: जिंकलेला उमेदवार फेरमतमोजणीत पडला, सतेज पाटील केंद्रावर; रात्री उशिरा मोठा राडा
Quick Answers
काही अतिमहत्त्वाकांक्षी नेते समाजविघातक शक्तींना पाठिंबा देत असल्याचे सांगत मोहन भागवत यांनी देशविरोधी कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच केवळ आंदोलनांतून समस्या सुटणे सोपे नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी समाजात फूट पडू न देण्याचे आवाहन केले.
भागवत यांच्या मते, सत्तांतर म्हणजेच 'रेजीम चेंज' केल्याने परिस्थिती बदलते हा अनेकांचा समज चुकीचा आहे; पूर्वीही तसे झाले नाही आणि पुढेही होणार नाही. भारत प्रगत झाल्यास आपल्या हेतूंना बाधा पोहोचेल या भीतीने काही आसुरी शक्ती भारताला तोडण्यासाठी टपून बसल्या आहेत, असेही ते म्हणाले.
आंदोलनांचा उद्देश केवळ समस्या सोडवणे हाच असावा, अन्यथा ते राजकीय स्वरूप घेऊन समाजात शत्रूभाव वाढवू शकते आणि त्याचा गैरफायदा देशविरोधी शक्ती घेऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलने राज्यघटनेच्या चौकटीतच व्हावीत आणि समाजाने त्यात न अडकता परस्पर संवाद वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला.
हिमालयाच्या पट्ट्यात आणि विशेषतः नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीचा संदर्भ देत त्यांनी विकासाच्या संकल्पनेवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. विकासाच्या नावाखाली मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण होईल अशी परिस्थिती ओढवू नये, असा इशारा त्यांनी दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







