प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत रात्री उशिरा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एकूण २५ जागांसाठी झालेल्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ने १३ जागा जिंकत बाजी मारली आहे. तर, महायुतीच्या पॅनेलला १२ जागांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत सुरुवातीला सतेज पाटील गटाचे १४ आणि महायुतीचे ११ उमेदवार विजयी झाल्याचे सांगितले जात होते. पाटील यांच्या समविचारी आघाडीचे सचिन घोरपडे विजयी झाले होते. मात्र, फेरमतमोजणीत घोरपडे यांचा पराभव झाला आणि महायुतीच्या ‘प्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’चे अमर पाटील विजयी झाले. सुरुवातीला जिंकलेला उमेदवार पराभूत घोषित झाल्याने मतमोजणी केंद्रावर एकच खळबळ उडाली आणि निकाल १३-१२ असा बदलला.
या अनपेक्षित निकालानंतर मतमोजणी केंद्रावर मोठा राडा झाला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी तात्काळ मतमोजणी केंद्र गाठले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती मोठा गराडा घातला. जोपर्यंत अधिकृत आणि पूर्ण निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत आपण इथून हलणार नाही, अशी ठाम भूमिका पाटील यांनी घेतली. दरम्यानच्या काळात विश्वास पाटील आणि युवराज पाटील यांनी केलेला फेरमतमोजणीचा अर्जही फेटाळून लावण्यात आला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने त्यांना मोठा धक्का दिला. विशेषतः नवीद मुश्रीफ आणि अवघ्या ७ मतांनी पराभूत झालेल्या शौमिका महाडिक यांच्या पराभवामुळे महायुतीला मोठा फटका बसला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे; शिवाजी पार्क आणि नेस्को सेंटरवर धडाडणार तोफा
- गोकुळ दूध संघ निवडणूक: मतमोजणी रखडल्याने संशय; अधिकाऱ्यांवर दबाव असल्याचा विरोधकांचा आरोप
- दसऱ्यापूर्वी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो, घरच्या घरी फक्त ४ स्टेप्समध्ये करा हे फेशियल
Quick Answers
या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ने एकूण २५ पैकी १३ जागा जिंकत बाजी मारली, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या.
फेरमतमोजणीत समविचारी आघाडीचे सचिन घोरपडे यांचा पराभव झाला आणि महायुतीच्या आघाडीचे अमर पाटील विजयी झाले.
सतेज पाटील यांनी तात्काळ मतमोजणी केंद्र गाठून, जोपर्यंत अधिकृत आणि पूर्ण निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत तिथून न हलण्याची ठाम भूमिका घेतली.
महायुतीला नवीद मुश्रीफ आणि अवघ्या ७ मतांनी पराभूत झालेल्या शौमिका महाडिक यांच्या पराभवामुळे मोठा फटका बसला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






