Share

“घरी आल्यावर काय हाकलून देऊ?” अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “मी इतका ‘अडाणी’ नाहीये!”

गौतम अदानींसोबतचा फोटो व्हायरल करणाऱ्यांवर राज ठाकरे संतापले. “घरी आलेल्यांना हाकलून देऊ का? महाराष्ट्रावर संकट आल्यास मी दोस्ती बघणार नाही,” असे ठणकावत त्यांनी विरोधकांना गप्प केले.

Published On: 

Raj Thackeray adani

🕒 1 min read

ठाणे – “माझ्या घरी (Raj Thackeray) गौतम अदानी येऊन गेले, रतन टाटा आले, अंबानी आले… पण घरी कोणी आलं म्हणून काय त्यांची पापं झाकायची का?” असा रोखठोक सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गौतम अदानींच्या भेटीचा जुना फोटो व्हायरल करून टीका करणाऱ्यांना राज ठाकरेंनी भरसभेत सडेतोड उत्तर दिले.

Raj Thackeray’s Savage Reply to Trolls on Adani Photo

धारावी पुनर्विकास आणि गौतम अदानींच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. यानंतर सोशल मीडियावर राज ठाकरे आणि गौतम अदानी यांचा एक जुना फोटो व्हायरल करण्यात आला. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “काल मी अदानींचं प्रकरण काढल्यावर अनेकांना मिरच्या झोंबल्या. दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो काढून आता संबंध जोडले जात आहेत. अरे, माझ्या घरी रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांच्यासारखे अनेक दिग्गज येऊन गेलेत. पण पाहुणा म्हणून घरी कुणी आलं, म्हणून त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचं का? घरी आलेल्या माणसाला मी काय हाकलून देऊ?”

पुढे बोलताना त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. “जेव्हा महाराष्ट्रावर किंवा मुंबई-ठाण्यावर संकट येईल, तेव्हा राज ठाकरे मैत्री-दोस्ती पाहणार नाही. महाराष्ट्राच्या हितापुढे मला काहीही महत्त्वाचे नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी केलेल्या कोटीने उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. “अदानींशी (Gautam Adani) दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही, कारण त्यांच्याशी मैत्री करायला मी इतका ‘अडाणी’ नाहीये,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची बोलती बंद केली.

घरी आल्यावर काय हाकलून देऊ?" अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरे म्हणाले, 'मी इतका 'अडाणी' नाहीये!'

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)