Share

Malaika Arora । अरबाज खान नंतर मलायका अरोरा चढणार बोहल्यावर; केली मोठी घोषणा

Malaika Arora Ready For Second Marriage After Arbaz Khan Get Married With Shura Khan । Arbaaz Khan’s Reaction To The Question Of Malaika Arjun’s Marriage । How Much Money Did Malaika Arora Got As Her Alimony From Arbaaz Khan । Arhaan Khan Back To Mother Malaika Arora Home After Arbaaz Khan Second Marriage

Published On: 

🕒 1 min read

Malaika Arora ।  मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. अरबाज खानने दुसऱ्यांदा आयुष्याची नवी सुरुवात करत वयाच्या 57 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. 24 डिसेंबर रोजी अरबाज खान ( Arbaz Khan )  याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केले आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान ( Arbaz Khan ) यांचा मुलगा अरहान खान देखील या लग्नाला उपस्थित होते. वडिलांच्या दुसऱ्या लग्नात त्याने वडील आणि सावत्र आईसोबत डान्स केला. तिघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अरबाज खान याने दुसरं लग्न केल्यानंतर मलायका हिच्या देखील दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मलायकाने एका मुलाखतीत दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले.

फाराह खान हिने मलायका ( Malaika Arora ) विचारले की, ‘तू सिंगल मदर आणि अभिनेत्री पासून डबल पॅरेंट आणि अभिनेत्री होणार आहेस? यावर मलायका म्हणते, ‘म्हणजे मला पुन्हा कोणाला दत्तक घ्यावं लागेल…’

पुढे गौहर खानने मलायका हिला प्रश्न समजून सांगत विचारले, ‘तू दुसरं लग्न करणार आहेस का?’ यावर मलायका ( Malaika Arora ) म्हणते ‘100 टक्के लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल असं मलायका म्हणाली.’  मलायका सद्या अभिनेता अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) याला डेट करत आहे.

Arbaaz Khan Reaction on Malaika Arjun Marriage

मलायका अरोरा ( Malaika Arora ) आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबत अरबाज खानला विचारले असता, तो पत्रकाराला म्हणाला ‘ ‘बरं, तू हा अत्यंत बुद्धिमान प्रश्न विचारला आहेस, तू रात्रभर याचा विचार केला असेल. सर, मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. पण तू विचार करायला एवढा वेळ घेतलास म्हणून मला पण थोडा वेळ दे मी उद्या सांगितले तर चालेल का? अशी मजेशीर प्रतिक्रिया त्याने दिली.

How Much Money Did Malaika Arora Got As Her Alimony From Arbaaz Khan

मलायका अरोरा ( Malaika Arora ) आणि अरबाज खान ( Arbaz Khan ) यांनी 1998 मध्ये लग्न केलं होते, दोघांचं नातं 18 वर्ष टिकलं. मलायका आणि अरबाज यांना अरहान हा 21 वर्षांचा मुलगा आहे. 2016 मध्ये दोघांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि त्यानंतर 2017 मध्ये अखेर त्यांना घटस्फोट मिळाला.

घटस्फोटानंतर मलायकाने अरबाजकडे किती पोटगी मागितली, असा प्रश्न अनेकांना पडला होता त्यावर वकील वंदना शाहने सांगितलं होतं की पोटगीचा विषय अत्यंत गोपनीय आहे. त्यामुळे सार्वजनिकरित्या मी त्याविषयी काही बोलू शकणार नाही. पण रिपोर्ट्सनुसार, मलायकाने अरबाजकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. अरबाजने मलायकाला 15 कोटी रुपये पोटगी म्हणून दिल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही