जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्कमधील एक करोडपती फायनान्सर होता, ज्याचे अनेक बडे राजकारणी आणि सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. २००५ मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आणि २००८ मध्ये दोषी ठरल्याने त्याला १३ महिने तुरुंगवास भोगावा लागला. पुढे २०१९ मध्ये लैंगिक तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्याखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली, मात्र खटला सुरू होण्यापूर्वीच त्याने तुरुंगात आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारात त्याला साथ देणारी त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल हिला २०२१ मध्ये दोषी ठरवण्यात आले असून ती सध्या २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
एपस्टीन प्रकरण
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन कोण होता?
जेफ्री एपस्टीन हा न्यूयॉर्कमधील एक करोडपती फायनान्सर होता, ज्याचे अनेक बडे राजकारणी आणि सेलिब्रिटींशी जवळचे संबंध होते. २००५ मध्ये त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला आणि २००८ मध्ये दोषी ठरल्याने त्याला १३ महिने तुरुंगवास भोगावा लागला. पुढे २०१९ मध्ये लैंगिक तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्याखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली, मात्र खटला सुरू होण्यापूर्वीच त्याने तुरुंगात आत्महत्या केली. या सगळ्या प्रकारात त्याला साथ देणारी त्याची जोडीदार घिसलेन मॅक्सवेल हिला २०२१ मध्ये दोषी ठरवण्यात आले असून ती सध्या २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
"त्याला मी 'दोन तोंडी' वाटायचो"; हरदीप पुरींचा राहुल गांधींवर पलटवार
एपस्टीनशी झालेले संवाद केवळ ‘इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट’च्या व्यावसायिक कामासाठी होते, असे स्पष्टीकरण पुरींनी दिले. एपस्टीनने स्वतःच्या ईमेलमध्ये माझा उल्लेख ‘Two-faced’ (दोन तोंडी) केला होता, कारण मी त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला साथ देणारा नव्हतो, असा दावा पुरींनी केला. राहुल गांधींनी अर्धवट माहितीच्या आधारे चिखलफेक करू नये, असे आव्हान देत सर्व आरोप पुरींनी फेटाळून लावले.
हरदीप पुरी आणि एपस्टीनचे ६१२ ईमेल
- संसदेत खळबळ: राहुल गांधींनी ‘एपस्टीन फाइल्स’चा दाखला देत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरींवर गंभीर आरोप केले.
- ६१२ ईमेलचा दावा: २०१४ ते २०१७ दरम्यान पुरी आणि कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीनमध्ये ६१२ ईमेल आणि १४ बैठका झाल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
- राजीनाम्याची मागणी: संसद भवनाच्या गेटबाहेर खासदारांनी निदर्शने करत पुरींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
एपस्टीन फाइल्सचा हादरा: जगभरातील १५ दिग्गजांचे राजीनामे, अब्जाधीश थॉमस प्रिट्झकरही अडकले
अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर जगभरातील अनेक बड्या प्रस्थांना हादरा बसला असून राजीनाम्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. यात आता हयात हॉटेल्सचे कार्यकारी अध्यक्ष आणि ६.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेले अब्जाधीश थॉमस प्रिट्झकर यांची भर पडली आहे. १९९९ पासून या पदावर असलेले प्रिट्झकर आणि एपस्टीन हे २००८ पासून नियमित संपर्कात होते. तसेच त्यांच्यात गुंतवणूक आणि काही वैयक्तिक मदतीसाठी अनेकदा ईमेल्सद्वारे चर्चा झाल्याचे अमेरिकन न्याय विभागाच्या कागदपत्रांवरून समोर आले आहे. एपस्टीन फाइल्समध्ये नाव आल्याने आतापर्यंत केवळ प्रिट्झकरच नव्हे, तर डीपी वर्ल्डचे सीईओ बिन सुलायम, ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि हार्वर्डच्या माजी अध्यक्षांसह १० देशांतील तब्बल १५ दिग्गज नेते, बँकर्स आणि उद्योगपतींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
'मी टू' चळवळीमुळे एपस्टीनचे कांड पुन्हा उघड
- २००९ मध्ये तुरुंगातून सुटल्यावर एपस्टीन शांत होता. पण २०१७ मध्ये अमेरिकेत सुरू झालेल्या ‘मी टू’ (#MeToo) चळवळीने चित्र बदलले.
- हॉलिवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनच्या शोषण प्रकरणातून या मोहिमेची ठिणगी पडली. यात अँजेलिना जोली आणि इतर अनेक बड्या अभिनेत्रींनी आपले अनुभव मांडले.
- याच लाटेत व्हर्जिनिया ग्रिफी हिने पुढे येत एपस्टीनवर गंभीर आरोप केले. सलग तीन वर्षे आपले लैंगिक शोषण झाल्याचा तिने दावा केला.
- तिच्या या खुलास्यानंतर तब्बल ८० हून अधिक महिलांनी एपस्टीनविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आणि त्याचे सत्य पुन्हा चव्हाट्यावर आले.
20 Feb 2026 10:36 PM
फ्लोरिडामधले ते दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक काळ होता. “मी कुठे आलेय हेच मला कळत नव्हतं. माझ्याकडे एक रुपयाही नव्हता आणि मला अक्षरशः कोंडून ठेवलं होतं,” असा अंगावर काटा आणणारा अनुभव रिनाने सांगितला. त्या घरात अनेक लोकांची ये-जा असायची आणि हे लोक थेट ‘मसाज रूममध्येच’ जायचे, असा धक्कादायक खुलासाही तिने केलाय. इतर मुलींना बाहेर जाण्याची मुभा होती, पण रिनाला तिथून बाहेर पडण्याची कोणतीही परवानगी नव्हती, त्यामुळे ती एका परक्या ठिकाणी पूर्णपणे अडकून पडली होती.
फ्लोरिडातील 'मसाज रूम'चं काळं सत्य उघड
फ्लोरिडामधले ते दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक काळ होता. “मी कुठे आलेय हेच मला कळत नव्हतं. माझ्याकडे एक रुपयाही नव्हता आणि मला अक्षरशः कोंडून ठेवलं होतं,” असा अंगावर काटा आणणारा अनुभव रिनाने सांगितला. त्या घरात अनेक लोकांची ये-जा असायची आणि हे लोक थेट ‘मसाज रूममध्येच’ जायचे, असा धक्कादायक खुलासाही तिने केलाय. इतर मुलींना बाहेर जाण्याची मुभा होती, पण रिनाला तिथून बाहेर पडण्याची कोणतीही परवानगी नव्हती, त्यामुळे ती एका परक्या ठिकाणी पूर्णपणे अडकून पडली होती.
शिक्षणाच्या नावाखाली थेट नरकात; असं रचलं शिष्यवृत्तीचं जाळं
हे सगळं १९९० साली सुरू झालं. रिनाला कला क्षेत्रात शिक्षण घ्यायचं होतं. “कोणत्याही अटींशिवाय मी तुला शिष्यवृत्ती देतो, आणि तुला मला परत भेटावंही लागणार नाही,” असं गोड बोलून एपस्टीनने तिला जाळ्यात ओढलं. पण नंतर त्याने तिला भेटण्यासाठी सतत दबाव आणायला सुरुवात केली. रिनाने त्याला भेटण्यास स्पष्ट नकार दिला. यावर “तू आज्ञाधारक नाहीस,” असं म्हणत त्याने आपला खरा चेहरा दाखवून दिला आणि तिची शिष्यवृत्तीच रोखून धरली.
डोनाल्ड ट्रम्प यांना सर्व माहिती होते! रिना ओहचा खळबळजनक दावा
एपस्टीन प्रकरणातील पीडिता रिना ओह हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ‘डोनाल्ड ट्रम्प यांना या काळ्या कृत्यांची आणि तिथल्या सर्व घडामोडींची पूर्ण माहिती होती’, असा मोठा गौप्यस्फोट रिनाने केलाय. या भयानक अंधारकोठडीत तिला बंदीवासात ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तसेच, याबाबत चुकूनही कुठे वाच्यता केल्यास गंभीर शारीरिक त्रास देण्याची थेट धमकीही एपस्टीनने तिला दिली होती. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मी निर्दोष ठरलो! एपस्टीन फाईल्स प्रकरण, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
एपस्टीनच्या प्रकरणात मला पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आले आहे. ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, नंतर हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या एका समाजसेवकाला मिळाला. एपस्टीनच्या फाईल्समध्ये ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्काराचा उल्लेख आहे. फाईल्समधून असे समोर आले आहे की, ट्रम्प यांचे निकटवर्तीय स्टीव्ह बैनन यांनी एका ईमेलमध्ये एपस्टीनने ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कारासंबंधी लिहिले आहे. जेफरी एपस्टीनशी माझा काहीही संबंध नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे.
19 Feb 2026 09:20 PM
माजी प्रिन्स अँड्र्यू यांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून या प्रकरणी यूके पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात आता किंग चार्ल्स म्हणाले,”अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांच्याबद्दलच्या बातम्या आणि सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा संशय याबाबत मला खूप चिंता वाटते. आता यापुढची प्रक्रिया म्हणजे या प्रकरणाची योग्य पद्धतीने आणि योग्य अधिकाऱ्यांकडून पूर्ण आणि निष्पक्ष चौकशी होईल. या चौकशीमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे, आमचा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य राहील. मी स्पष्ट करु इच्छितो की जी कायदेशीर कारवाई आहे ती केली गेली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू असताना, या विषयावर अधिक भाष्य करणे माझ्यासाठी योग्य ठरणार नाही.”
19 Feb 2026 09:18 PM
“ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे त्यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांच्या उर्वरित सर्व पदव्या काढून घेण्यात येत आहेत आणि त्यांना राजघराण्यातून बेदखल करण्यात येत आहे. तसेच ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांनी प्रिन्स अँड्र्यू यांच्या सर्व पदव्या आणि त्यांचा सन्मान काढून टाकण्याच्या संदर्भातील सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली आहे”, असं बकिंगहॅम पॅलेसच्या निवेदनात म्हटलं आहे.
19 Feb 2026 09:17 PM
ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांचे भाऊ प्रिन्स अँड्र्यू यांची काही महिन्यांपूर्वी राजघराण्यातून हकालपट्टी करण्यात आली होती. अँड्र्यू यांच्याकडून त्यांच्या पदव्या काढून घेण्यात आल्या होत्या. तसेच ब्रिटनमधील बकिंगहॅम पॅलेसमधून प्रिन्स अँड्र्यू यांना बाहेर काढण्यात आलं होतं.
19 Feb 2026 09:17 PM
एपस्टीन प्रकरणात ब्रिटनचे माजी प्रिन्स अँड्र्यू यांना आज सकाळी ८ वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेवेळी यूके पोलीस साध्या वेशात आले होते.