Share

Kirit Somaiya | आक्षेपार्ह व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांचं फडणवीसांना पत्र, म्हणाले…

🕒 1 min readKirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट … Read more

Published On: 

🕒 1 min read

Kirit Somaiya | टीम महाराष्ट्र देशा: भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

त्याचबरोबर त्यांच्या या व्हिडिओवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवलं आहे.

I have never abused any woman – Kirit Somaiya

ट्विट करत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, “एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे.

माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी देवेंद्र फडणवीस
यांना विनंति.”

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात किरीट सोमय्या म्हणाले, “मी अनेक महिलांवर अत्याचार केले अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याचे अनेक व्हिडिओ क्लिप्स आहे, असे दावे केले जात आहेत.

मात्र, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी अशी माझी आपणास विनंती आहे.”

दरम्यान, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला चांगलं सुनावलं आहे. भाजपचं राजकारण दिवसेंदिवस घाणेरडे होत चाललं असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!