Monsoon Session | शेतकरी संकटात असताना काही टोळ्या हप्ते वसूल करतायं – बाळासाहेब थोरात

Monsoon Session | मुंबई: आजपासून (17 जुलै) राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतरच हे पहिलंच अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.

Still 50 percent of the state has not received rain – Balasaheb Thorat

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “राज्यामध्ये पावसाची स्थिती अत्यंत बिकट आहे. राज्यात अजूनही 50% क्षेत्रात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे फक्त 20 टक्के पेरण्या झाल्या आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. राज्यात पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत सापडला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच काही टोळ्या हप्ते वसूल करत आहेत.”

“मंत्रिमंडळ विस्तार, खाते वाटप, दिल्ली वारी यातच सध्याचं सरकार व्यस्त आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्य शासनाचा शेतकऱ्यांकडे अजिबात लक्ष नाही. म्हणून सभागृहात प्रगत प्रस्ताव मांडून त्यावर चर्चा करण्यात यावी”, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना केली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.