Bacchu Kadu | “बच्चू कडूंना मंत्रिपद…”; मुख्यमंत्री शिंदेंना कार्यकर्त्यानं लिहिलं रक्तानं पत्र

Bacchu Kadu | सोलापूर: अजित पवार आणि त्यांचे सहकारी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री पदावर यापुढे दावा करणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय तात्पुरता मागे घेतला होता.

आज (17 जुलै) बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. यादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चक्क रक्तानं पत्र लिहिलं आहे.

बच्चू कडूंना (Bacchu Kadu) मंत्रिपद द्या, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. माढा तालुक्यातील रुई येथील दीपक लांडगे या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे.

MLA Bachchu Kadu should be included in the state cabinet

सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना स्थान द्यावे, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

दीपक लांडगे यांच्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अनेक वेळा मंत्री मंडळ विस्तार लांबल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. मला मंत्रिमंडळात स्थान नको मी आता मंत्रिमंडळ विस्तारावरचा दावा सोडतो, हा निर्णय जवळपास बच्चू कडू यांनी घेतला होता.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यामुळे त्यांनी हा निर्णय तुर्तास मागे घेतला. आज मुख्यमंत्री शिंदे आणि बच्चू कडू यांची बैठक होणार आहे. त्यानंतर बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.