Eknath Shinde | नाशिक: नाशिक शहरामध्ये आज शासन आपल्यादारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तोंड भरून कौतुक केलं.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “आम्ही तिघे एकत्र आलो आहोत. यावर लोक म्हणतात आता काय होणार? मात्र आम्ही सगळे समजूतदार आहोत. त्यात मी आणि देवेंद्र फडणवीस गेल्या अनेक वर्षांपासून मित्र आहोत.
देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सांभाळला. तर आता आम्ही दोघं सोबत काम करत आहोत.”
Devendra Fadnavis has a very big heart – Eknath Shinde
पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार सामील झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांचं मन खूप मोठं आहे. मी त्यांना उपमुख्यमंत्री अजिबात समजत नाही.
मी त्यांच्याकडे नेहमी मित्र, सहकारी, सोबती म्हणून बघतो. त्यांचा राजकीय अनुभव वापरूनच आम्ही सरकारला पुढं नेणार आहोत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा स्वतः उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा उपमुख्यमंत्री स्वीकारला.”
“देवेंद्र फडणवीस खूप मोठ्या मनाचे आहेत. मात्र, काही लोक त्यांच्यावर कलंक लावण्याचं काम करत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो देवेंद्र फडणवीस कलंक नाही तर निष्कलंकित माणूस आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मोठेपणा दिलदारपणा खूप मोठा आहे”, असही ते (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis | विरोधकांच्या पोटदुखीवर औषध देण्यासाठी डॉ. एकनाथ शिंदेंना आणलायं – देवेंद्र फडणवीस
- Eknath Shinde | घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
- Nikhil Wagle | शिंदे-फडणवीस युती मोडीत काढायची सुपारी तर दादांनी घेतली नाही ना? – निखिल वागळे
- Sanjay Raut | शिंदे गटाला अजितदादांची धुणीभांडी करावी लागणार – संजय राऊत
- Ajit Pawar | मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही; अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला