Bacchu Kadu | तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो – बच्चू कडू

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या एकूण 09 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेवरून शिंदे गट आणि भाजपचे आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तर आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Three engines have come together in the politics of the state – Bacchu Kadu

माध्यमांशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “सध्या खाते वाटपाचा गोंधळ सुरू आहे. सध्या तीन इंजिन एकत्र आले आहेत. ते मजबूत होऊ शकतात नाही तर त्यामध्ये बिघाड देखील होऊ शकतो. या तिन्ही इंजिनमध्ये बिघाड होऊ नये म्हणून बैठकी सुरू आहेत. मला कुठल्याही मंत्री पदाची अपेक्षा नाही. अपेक्षा ठेवून मी कधी चालत नाही. मला जे मंत्रिपद मिळेल ते मी स्वीकारेल.”

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “अजितदादा गट आल्यानंतर नाराजी होणारच. कारण प्रत्येकाची आपापली वेगवेगळी अपेक्षा आहे. काही आमदारांना वाटतं अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये. अजित पवारांकडं अर्थ खात गेलं तर ते राष्ट्रवादीला जास्त निधी देतील इतरांना कमी निधी देतील. त्यांच्याकडे अर्थ खात गेलं तर हा भेदभाव होत राहील. त्यामुळे अर्थ खात अजित पवारांकडे जाऊ नये, असं सर्वांचं म्हणणं आहे.”

“मंत्रिमंडळानंतर आमदारांची नाराजी दूर करणं मोठं चॅलेंज असणार आहे. म्हणजे ही एक प्रकारची कसरतच असेल. कारण बऱ्याच  आमदारांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे. आमच्यात तिसरा आल्यानं त्यांच्या वाट्याला जास्त गेलं आहे. आमच्या घासातला घास खायला राष्ट्रवादी सत्तेत आल्या नाराजी होणारच”, असही ते यावेळी म्हणाले. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.