Nitesh Rane | “बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा आधार घेत मी उद्धव ठाकरेंना हिजडा..”; तृतीयपंथीयांच्या नाराजीवर नितेश राणेंचं स्पष्टीकरण

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ‘नागपूरला लागलेला कलंक’ म्हणत टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला होता. त्यानंतर तृतीयपंथी समाजानं नितेश राणे यांच्याविरुद्ध आंदोलन केलं.

It was not my intention to hurt anyone’s feelings – Nitesh Rane

नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वक्तव्यानंतर तृतीयपंथी समाज आक्रमक झाला. त्यांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलन करत त्यांचा निषेध केला. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नितेश राणे म्हणाले, “मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचा आदर घेत बोललो आहे.

काँग्रेसच्या समोर झुकणारे सगळे हिजडे असतात असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या वक्तव्याचा आधार घेऊन मी उद्धव ठाकरेंना हिजड्यांचा प्रमुख म्हटलं आहे. हे वक्तव्य मी राजकीय दृष्टीनं केलं होतं. यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचं माझं उद्दिष्ट नव्हतं. त्यामुळे आधी माझं वक्तव्य समजून घ्यावं आणि त्यानंतर त्याचा विरोध करावा.”

उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) तृतीयपंथी समाजाचा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला असल्याचं तृतीयपंथींनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्याविरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आम्ही करणार आहोत, असे तृतीयपंथीयांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तृतीयपंथी समाज आक्रमक होऊन त्यांनी पुण्यात आंदोलन केलं आहे. “नितेश राणे यांनी हिजडा शब्दाचा अपमान केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. तृतीयपंथी समाजाला एक वेगळी सामाजिक ओळख आहे. त्यामुळे राणेंनी स्वतःची संवेदनशीलता वाढवावी”, असं तृतीयपंथी समाजातील काही लोकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.