Nitesh Rane | पुणे: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ‘कलंक’ शब्दावरून टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजप नेते नितेश राणे यांनी उत्तर दिलं होतं. हिजड्यांच्या प्रमुखांकडून अजून काय अपेक्षा, असं नितेश राणे म्हणाले होते. नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर तृतीयपंथी आक्रमक झाले आहे.
What else is expected from the leaders of Hijras? – Nitesh Rane
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “मर्दानगी वर कलंक ! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा..बायला कुठला!!” नितेश राणे यांच्या या वक्तव्यानंतर तृतीयपंथी आक्रमक झालेला असून त्यांनी राणेंविरोधात आंदोलन केलं आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) तृतीयपंथीयांचा चुकीच्या पद्धतीनं उल्लेख केला असल्याचं तृतीयपंथींनी म्हटलं आहे. नितेश राणेंविरुद्ध आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहोत. नितेश राणे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. “आमची मत खाऊन हा माणूस आम्हाला शिव्या देत आहे. त्यामुळे याला जोड्यानं मारायला काही हरकत नाही. नितेश राणे आमच्यासमोर आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फसू”, असं देखील तृतीयपंथीयांनी म्हटलं आहे.
“नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हिजडा या शब्दाचा अपमान केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो. आम्ही फक्त निषेध करणार नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार देखील नोंदवणार आहोत. तृतीयपंथीयांना देखील सामाजिक ओळख आहे. त्यामुळे नितेश राणेंनी स्वतःची संवेदनशीलता वाढवावी, असं आम्ही त्यांना सांगू इच्छितो”, असं देखील तृतीयपंथीयांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Cabinet Expansion | आज होणार मंत्रिमंडळ विस्तार? मुख्यमंत्र्यांच्या बैठका पुढे ढकल्यामुळे चर्चांना उधाण
- Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं – संजय राऊत
- Sanjay Kakade | एकनाथ शिंदेंना डच्चू? अजित पवार होऊ शकतात मुख्यमंत्री – संजय काकडे
- Bacchu Kadu | तीन इंजिनच्या सरकारमध्ये कधीही बिघाड होऊ शकतो – बच्चू कडू
- Ravi Rana | आधी छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे तर आता आमदार रवी राणांना जीवे-मारण्याची धमकी