Eknath Shinde | मुंबई: अजित पवार काही आमदारांसह महायुतीत सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत आलेल्यांपैकी 09 जणांनी मंत्र पदाची शपथ घेतली. या घटनेला आठवडा उलटून गेला असला तरी खाते वाटपाचा तिढा मात्र सुटलेला नाही. गेल्या तीन दिवसापासून खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. मात्र, हा प्रश्न त्यांच्याकडून सुटत नाहीये. त्यामुळे आता हा प्रश्न केंद्रात जाण्याची शक्यता आहे.
The cabinet cannot be expanded until the portfolio are allocated
मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील खाते वाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे जाणार आहे. कारण जोपर्यंत खाते वाटप होणार नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही.
त्याचबरोबर खातेवाटप झाल्यानंतरच मंत्र्यांची संख्या ठरणार आहे. आज शिंदे, फडणवीस आणि पवार दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर चर्चा केली जाणार आहे.
सध्या अर्थ खात भाजपकडे आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादीचा गट सामील झाल्यानंतर अर्थ खात अजित पवार यांना देण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अजित पवारांना अर्थ खात देण्यास शिंदे गटानं (Eknath Shinde) विरोध दर्शवला आहे.
राष्ट्रवादीला महत्त्वाची खाती हवी आहे, तर प्रमुख खाती न सोडण्याचा निर्धार देखील शिंदे गटानं केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून बैठका सुरू आहे. मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर तिने ते चर्चा करताना दिसत आहेत. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळत नाहीये. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी तीनही नेते अमित शहांची भेट घेणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | वर्षा बंगल्यावर असणार अजित पवारांचं वर्चस्व? सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
- Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरात साप निघाल्यावर भरत गोगावले म्हणतात, “अति तेथे माती…”
- Nitesh Rane | नितेश राणेंच्या तोंडाला काळं फसणार; राणेंवर तृतीयपंथी भडकले
- Cabinet Expansion | आज होणार मंत्रिमंडळ विस्तार? मुख्यमंत्र्यांच्या बैठका पुढे ढकल्यामुळे चर्चांना उधाण
- Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं – संजय राऊत