Sanjay Raut | संजय राऊतांच्या घरात साप निघाल्यावर भरत गोगावले म्हणतात, “अति तेथे माती…”

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांच्या घरी साप निघाला. त्यानंतर सगळीकडे खळखळ उडाली होती. सुदैवानं यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडलेली नाही. मात्र, या प्रकरणावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut’s mouth should have been bitten by a snake – Bharat Gogawale

भरत गोगावले म्हणाले, “संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरामध्ये निघालेला साप त्यांच्या तोंडाला चावायला हवा होता. कारण संजय राऊत खूप बोलतात. अति तिथे माती हे ठरलेलं आहे. माणसाने किती बोलावं यासाठी प्रत्येकाला लिमिट आहे.

सापानं संजय राऊतांना कमी बोलण्याचा इशारा दिला असेल. संजय राऊत चुकीचं बोलू नका असं सांगण्यासाठी साप निघाला असेल.”

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) सरकारवर हल्लाबोल चढवला होता. ते म्हणाले, “अजित पवार आणि त्यांचे आमदार राज्य सरकारमध्ये फक्त दोन गोष्टींसाठी सहभागी झाले आहे. एक म्हणजे ईडी कारवाई दाबण्यासाठी आणि दुसरी म्हणजे बंगल्यासाठी. सरकारनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं आहे.”

“गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्राला ज्यांनी कलंक लावला आहे त्यांनाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कलंकित म्हटलं आहे. हल्ली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लवकर मिरची लागते.

कारण कालचा मुख्यमंत्री आज भ्रष्टाचार करणाऱ्यांबरोबर बसत आहे. ज्यांना ते जेलमध्ये पाठवण्याच्या तयारीत होते आता त्यांना त्यांच्याच बाजूला बसावं लागत आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.