Share

Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारसोबत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारसोबत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण), गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

राज्य सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) तब्बल 109 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून किमान इयत्ता दहावी परीक्षा आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, वय, पगार आणि इतर तपशिलांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.mahadiscom.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1JnqKyiIumOrHG8e3tr34KZghS4o2LhwB/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही