Indian Army Recruitment | दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Indian Army Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. विविध पदांच्या 12 रिक्त जागा भारतीय सैन्याच्या … Read more

Published On: 

Indian Army Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 12 रिक्त जागा

भारतीय सैन्याच्या या भरती प्रक्रियेमध्ये 12 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सिपॉय फार्मा पदांच्या रिक्त जागा उपलब्ध आहे.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून किमान दहावी उत्तीर्ण असावा. या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक उमेदवार दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही