Share

Job Vacancies | भारतीय खाण ब्युरो यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

🕒 1 min readJob Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारतीय खाण ब्युरो (Indian Bureau of Mines), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात भारतीय खाण ब्युरो (Indian Bureau of Mines), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

भारतीय खाण ब्युरो यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांना दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

खाण नियंत्रक (नियोजन आणि समन्वय), ब्लॉक ‘डी’, दुसरा मजला, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

अधिकृत वेबसाईट

https://ibm.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1FQJx3BrbcATInnTrbMoEgHG0HMgXvL8x/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Job Education

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या