Share

सोन्या आणि चांदीच्या तेजीला अचानक ब्रेक; दरात मोठी घसरण, पुढे काय होणार?

सलग चार दिवस वाढणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या दरांना ब्रेक लागला असून नफावसुली आणि जागतिक तणावामुळे दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Published On: 

Gold Silver Rate: सोन्या-चांदीत मोठी उसळी, ग्राहकांना फटका!

लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग जरा थांबा. कारण सलग चार दिवस उसळी घेणाऱ्या सोन्या आणि चांदीच्या दरांनी आज अचानक रिव्हर्स गिअर टाकला आहे. बाजारात अचानक असं काय घडलं की सोन्याचा भाव एकदम घसरला, असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल.

एमसीएक्सवर (MCX) एप्रिल गोल्ड वायदा ०.५० टक्क्यांपेक्षा अधिक घसरून थेट १,६०,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. सोबतच एप्रिल सिल्वर वायद्यातही मोठी घसरण झाली असून तो २,६४,९७२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात जोरदार तेजी होती. पण आता गुंतवणूकदारांनी जोरदार नफावसुली सुरू केल्याने बाजारात हा दबाव वाढल्याचे दिसत आहे.

Gold Silver Rate Fall

त्यातच अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव आणि अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबतची अनिश्चितता यामुळे जागतिक बाजार अस्थिर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.७१ टक्क्यांनी घसरून ५,१८७ डॉलर प्रति औंसवर आले आहे.

महागाई अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे. व्याजदर चढेच राहिले तर Gold Silver Rate सारख्या नॉन यिल्डिंग मालमत्तेचे आकर्षण गुंतवणूकदारांमध्ये साहजिकच कमी होते. याच कारणामुळे आज बाजारात ही मोठी पडझड पाहायला मिळाली.

आता सोनं आणखी स्वस्त होणार का? यावर तज्ज्ञांनी महत्त्वाचे मत मांडले आहे. त्यांच्या मते सध्याची घसरण हा कायमस्वरूपी ट्रेंड बदल नाही. ही केवळ मोठ्या आर्थिक घडामोडींवर दिलेली तात्कालिक प्रतिक्रिया आहे. तांत्रिकदृष्ट्या सोने आणि चांदीची स्थिती अजूनही मजबूत आहे. काही महत्त्वाचे स्तर पार केल्यास बाजारात पुन्हा मोठी तेजी परतू शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही