🕒 1 min read
मुंबई – निवडणुकीच्या ४८ तास आधी प्रचाराच्या तोफा थंडावतात, हे वाक्य आपण वर्षानुवर्षे ऐकत आलोय. “आता शांतता काळ सुरू झाला, प्रचार बंद,” असं म्हणत पोलीस आणि आयोग करडी नजर ठेवतात. पण यंदा काहीतरी वेगळंच घडतंय. मतदानाला अवघे काही तास उरले असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतलेल्या एका निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा निर्णय नक्की काय आहे, हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
येत्या १५ जानेवारीला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान (Voting) होत आहे. नियमानुसार, १३ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपली आहे. पण, निवडणूक आयोगाने उमेदवारांना एक ‘विशेष सवलत’ दिली आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही, म्हणजे १३ ते १५ जानेवारी दरम्यान उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नेमका निर्णय काय?
निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी मुंबईतील ए, बी आणि ई वॉर्डमधील उमेदवारांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीच्या इतिवृत्तात (Minutes of Meeting) हा अजब निर्णय नमूद करण्यात आला आहे. यात स्पष्ट म्हटलंय की, उमेदवार मुदत संपल्यानंतरही मतदारांच्या घरी जाऊ शकतात, पण त्यांच्यासाठी एक कडक अट आहे. ती म्हणजे – “घरोघरी जाताना उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे पत्रक (Pamphlets) किंवा प्रचाराचे साहित्य वाटता येणार नाही.” तोंडी विनंती करायला मुभा, पण हातात कागद नको, असा हा प्रकार आहे.
इतिहासात पहिल्यांदाच!
महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात (Maharashtra Election History) अधिकृतपणे अशा प्रकारे ‘सायलेन्स पीरियड’मध्ये (Silence Period) सूट देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जातंय. एरवी छुपे प्रचार रोखण्यासाठी आयोग धडपडत असतो, तिथे आता उघडपणे दारात जाण्याची परवानगी मिळाल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा इतर उमेदवार कसा फायदा घेतात आणि विरोधक यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, १५ जानेवारीला मतदान पार पडेल आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १६ जानेवारीला ‘गुलाल कोणाचा?’ याचा निकाल लागणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ZP Election: अखेर बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ‘या’ तारखेला मतदान; तुमचं गाव यादीत आहे का?
- Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होणार थेट दुप्पट! एकदा गुंतवा अन् टेंशन विसरा
- लाडक्या बहिणींचा हिरमोड? आयोगाचा सरकारला दणका; आता खात्यात येणार फक्त ‘इतके’ पैसे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










