Share

“बुरखेवाली नव्हे, मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच!”; फडणवीसांचा वारिस पठाणांना ‘दे धक्का’, राऊतांवरही प्रहार!

CM Devendra Fadnavis asserts Mumbai’s Mayor will be Hindu and Marathi, criticizing Waris Pathan’s remarks and attacking Sanjay Raut for his silence.

Published On: 

sanjay raut criticized Devendra Fadnavis over waqf amendment bill

🕒 1 min read

मुंबई– महानगरपालिकेच्या सत्तेची चावी कोणाकडे असणार? यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. “मुंबईवर हिरवा झेंडा फडकणार, बुरखेवाली मेयर बनेगी,” अशी भाषा करणाऱ्यांना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिलंय. मुंबईतील सभेत बोलताना फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितलं की, “मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच असेल!”

परवा एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस कडाडले. “जेव्हा वारिस पठाण ‘बुरखेवाली मेयर’बद्दल बोलले, तेव्हा दररोज सकाळी वाजणारा ‘सकाळचा भोंगा’ (संजय राऊत) गप्प का होता?” असा खोचक टोला त्यांनी लगावला. “यावर कुणीच बोलायला तयार नाही, त्यामुळे आता आम्हालाच चार्ज करावं लागेल. जो वंदे मातरम म्हणायला नकार देईल, त्याला आमचा विरोध असेल. भारताशी दुश्मनी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,” असा सज्जड दमच त्यांनी (Devendra Fadnavis) दिला आहे.

Devendra Fadnavis asserts Mumbai’s Mayor Marathi

मराठी माणसाच्या मुद्द्यावरून त्यांनी ठाकरे गटाला आरसा दाखवला. “गिरणी कामगार आणि मराठी माणूस मुंबईबाहेर कुणामुळे हद्दपार झाला? तुम्ही काय फिक्स्ड डिपॉझिटच्या पावत्या चाटत बसला होतात का?” असा जळजळीत सवाल त्यांनी केला. पत्राचाळ आणि बीडीडी चाळीचा प्रश्न आम्ही सोडवला, आता मुंबईतला मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही, त्याला आम्ही हक्काचं आणि मोठं घर देऊ, असं आश्वासनही त्यांनी (Devendra Fadnavis) दिलं.

बांगलादेशी घुसखोरांबाबत बोलताना ते म्हणाले की, “गेल्या ६-७ महिन्यांत अनेक बांगलादेशींना आम्ही परत पाठवलंय. बंगालमधून ममता दीदींच्या आशीर्वादाने जे घुसखोर आलेत, त्यांनाही शोधून बाहेर काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.” फडणवीसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुंबई महापालिकेची आगामी लढाई ‘हिंदुत्व आणि विकास’ या मुद्द्यांवरच लढली जाणार, हे आता स्पष्ट झालंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या