Share

T20 World Cup: पाकिस्तानची ‘ती’ यादी लीक; बाबर-शाहीनला लॉटरी, पण ‘या’ स्टार खेळाडूचा पत्ता कट!

PCB submits provisional squad for T20 World Cup 2026 to ICC. Babar Azam and Shaheen Afridi likely included, while pacer Haris Rauf might be dropped.

Published On: 

India gears up for a busy 2026 with T20 World Cup 2026, Ind vs Pak clash on Feb 15, and Asian Games.

🕒 1 min read

पुणे – T20 World Cup 2026 ची रणधुमाळी सुरू व्हायला आता काहीच दिवस उरलेत. ७ फेब्रुवारीपासून क्रिकेटचा हा महाकुंभ भारत आणि श्रीलंकेत सुरू होतोय. पण त्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक नवा ‘सस्पेन्स’ निर्माण केलाय. आयसीसीकडे १५ खेळाडूंची यादी जमा केली खरी, पण ती चाहत्यांपासून लपवून ठेवली आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

सर्वात मोठा प्रश्न हाच होता की, फॉर्ममध्ये नसलेला बाबर आझम आणि दुखापतग्रस्त शाहीन आफ्रिदी संघात असणार की नाही? तर आता मिळालेल्या ‘लीक’ माहितीनुसार, पाकिस्तानने या दोघांवरही पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे. शाहीन अजूनही पूर्ण फिट नसल्याच्या चर्चा आहेत, पण तरीही त्याला वर्ल्ड कपच्या विमानाचे तिकीट मिळालंय.

संघात एक मोठं कमबॅक झालंय आणि एक मोठा धक्काही बसलाय. मे २०२५ पासून दुखापतीमुळे बाहेर असलेला ऑलराऊंडर शादाब खान संघात परतला आहे. मात्र, दुसरीकडे वेगवान गोलंदाज हॅरिस राऊफ (Haris Rauf) याला वगळल्याच्या जोरदार चर्चा आहेत. जर हॅरिस राऊफ बाहेर असेल, तर हा पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का असू शकतो.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. पण राजकीय तणावामुळे पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान हा ‘हाय व्होल्टेज’ सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे रंगणार आहे.

Pakistan Squad T20 World Cup 2026

संभाव्य पाकिस्तान संघ : बाबर आझम, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, फखर जमान, नसीम शाह, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, उस्मान खान, मोहम्मद वसीम जुनिअर, सलमान अली आगा, सैम अयुब आणि साहिबजादा फरहान.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!