Share

Pune Crime | पुण्यात कोयता गँगनंतर रुमाल गँगची दहशत! वनशिव झोपडपट्टी परिसरात फोडल्या गाड्या

Pune Crime | पुणे: पुण्यातील वारजे परिसरात काल (19 जून) कोयता गँगकडून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात पुन्हा एकदा आज पुण्यात गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसून आलं आहे. आज पहाटे तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टीमध्ये गाड्या फोडण्यात आल्या आहेत. 30 cars vandalized in Vanshiv slum area आज … Read more

Published On: 

Pune Crime | पुणे: पुण्यातील वारजे परिसरात काल (19 जून) कोयता गँगकडून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अशात पुन्हा एकदा आज पुण्यात गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसून आलं आहे. आज पहाटे तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टीमध्ये गाड्या फोडण्यात आल्या आहेत.

30 cars vandalized in Vanshiv slum area

आज (20 जून) तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टी परिसरात तब्बल 30 गाड्या फोडल्या (Pune Crime) आहे. 06 जणांनी तोंडाला रुमाल बांधून ही वाहन फोडली आहे. त्यामुळे या गाड्या रुमाल गँगनं फोडल्या असल्याचं बोललं जात आहे. या वाहनांमध्ये ऑटो रिक्षा, टेम्पो, कार इत्यादी वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी हा धक्कादायक प्रकार (Pune Crime) घडल्याचं दिसून आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, काल वारजे परिसरात कोयता गँगची (Koyta Gang) दहशत दिसून आली. वारजे परिसरातील कॅनल रोडवर या गँगने  काही गाड्यांच्या काचा फोडल्या (Pune Crime) आहे. वारजे येथील रामनगर कॅनल रोडवर नागेश्वर मंदिराजवळ सोमवारी (19 जुन) सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install