Deepak Kesarkar | ‘गद्दर दिवस साजरा’ झालाच पाहिजे; ठाकरे गटाच्या मागणीला दीपक केसरकरांचा पाठिंबा?

Deepak Kesarkar | पनवेल: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज ‘गद्दार दिन’ तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून ‘खोके दिन’ साजरा केला जात आहे. गद्दार दिन साजरा करण्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाठिंबा दिला आहे.

Traitor Day must be celebrated – Deepak Kesarkar

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “गद्दर दिवस साजरा केलाच पाहिजे. मात्र, ठाकरे गद्दार दिन साजरा झाला पाहिजे. कारण ठाकरे गटानं बाळासाहेबांच्या विचारांसोबत गद्दारी केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार स्वीकारले आहेत. त्यामुळे गद्दार दिन साजरा करायला हवा.”

पुढे बोलताना ते (Deepak Kesarkar) म्हणाले, “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करा असं बाळासाहेब ठाकरे सांगायचे. मात्र, ठाकरे गट हे सगळं विसरल्याचं दिसत आहे. कारण ती लोकं फक्त 100 टक्के राजकारण करत आहे. त्यामुळे ठाकरे गटातील काही लोक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा खूप आदर करतात आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. मला एक दिवस पंतप्रधान करा. मी 370 कलम रद्द करेल, असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. हे सर्व मोदींनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचं  स्वप्न पूर्ण केलं आहे”, असंही ते (Deepak Kesarkar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.