NCP | ’50 खोके एकदम OK’ म्हणतं राष्ट्रवादीचं गद्दार दिन आंदोलन

NCP | नाशिक: 20 जून 2022 रोजी राज्याच्या राजकारणात एक अनपेक्षित घटना घडली होती. या दिवशी शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड केलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार उभं राहिले होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजचा दिवस ‘खोके दिन’ म्हणून साजरा केला जात आहे.

Eknath Shinde’s rebellion has completed one year today

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) ‘गद्दार दिन’ आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ’50 खोके एकदम OK’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.

“एक वर्षापूर्वी काही आमदारांनी महाविकास आघाडीसोबत गद्दारी केली होती. या सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला निराश करण्याचं काम हे सरकार करत आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) कार्यकर्त्यांनं दिली आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील आजचा दिवस जागतिक गद्दार दिन घोषित करावा अशी मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, “आपण व्हॅलेंटाईन्स डे, योगा डे साजरा करतो. त्याचप्रमाणे गद्दार दिन देखील साजरा व्हायला हवा. जगातल्या सर्व गद्दारांसाठी हा दिवस साजरा करायला हवा. या दिवशी लोकांनी गद्दारांना जोडे मारायला हवे किंवा त्यांचं स्मरण करायला हवं”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.