Share

मोठी बातमी : लाईक्सच्या नादात ‘रीलस्टार’ गोत्यात; अथर्व सुदामेला PMPLचा कायदेशीर दणका, ७ दिवसांत माफी मागावी लागणार!

Pune influencer Atharva Sudame faces legal action from PMPL for unauthorized filming in a bus and allegedly insulting women in a reel.

Published On: 

Pune influencer Atharva Sudame faces legal action from PMPL for unauthorized filming in a bus and allegedly insulting women in a reel.

🕒 1 min read

पुणे: सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही, पण आता ही मस्ती एका प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरला चांगलीच महागात पडली आहे. पुण्याचा सुप्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे ( Atharva Sudame ) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विषय गंभीर आहे, कारण यावेळी पंगा थेट ‘पीएमपीएमएल’ (PMPL) प्रशासनाशी घेतलाय.

तुम्ही ती रील पाहिली असेलच… अथर्व बसमध्ये कंडक्टरच्या भूमिकेत दिसतोय. पीएमपीएमएल प्रशासनाचं म्हणणं आहे की, “रील बनवायला आमची हरकत नाही, पण परवानगी कुणाला विचारून घेतली?” अथर्वने व्हिडिओसाठी चक्क अधिकृत कंडक्टरचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला वापरला, आणि तेही कोणतीही अधिकृत परवानगी न घेता! शासकीय मालमत्तेचा असा खाजगी वापर करणं हा गुन्हा आहे, हे त्याला ( Atharva Sudame ) कुणी सांगितलं नाही का?

नुसता युनिफॉर्म वापरला असता तरी एकवेळ चाललं असतं, पण या रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान होईल असे चित्रण केल्याचा गंभीर आरोप प्रशासनाने केलाय. यामुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत असून प्रवाशांचा विश्वास उडतोय, असं नोटीसमध्ये स्पष्ट म्हटलंय. प्रशासनाने अथर्वला ७ दिवसांची ‘डेडलाईन’ दिली आहे. “त्वरित तो व्हिडिओ सोशल मीडियावरून उडवा आणि मुख्यालयात हजर राहून लेखी खुलासा करा, नाहीतर थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जा,” असा कडक इशारा पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला आहे.

यापूर्वीही गणेशोत्सवाच्या काळातही मूर्ती विक्रेत्यांबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ केल्याने त्याला माफी मागावी लागली होती. आता पुन्हा एकदा ‘सॉरी’ म्हणायची वेळ येणार की प्रकरण कोर्टात जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Atharva Sudame faces legal action from PMPL

नोटीसमध्ये काय? PMPL Notice

पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या (PMPL) मालकीच्या बसमध्ये शुटिंग, महामंडळाचा गणवेश, ई- मशिन किंवा बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करून परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्व परवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड व प्रसारित केल्याचे निदर्शनास आले आहे. रीलमध्ये महिला प्रवाशांचा अवमान आणि अपमानास्पद चित्रण करण्यात आले आहे.

या कृत्यामुळे महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा, मानसिक सुरक्षितता तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या महिलांच्या हक्कांना बाधा पोहोचत आहे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाची जनमानसात प्रतिमा मलिन होत असून पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अंतर्गत नियम, धोरणाच्या विरोधात आहे. परिवहन महामंडळाची प्रतिमा, व्यावसायिक हित व सार्वजनिक बस सेवे वरील विश्वासावर विपरित परिणाम होत आहे.

आपणास या नोटीसद्वारे कळविण्यात येत आहे की सदर आक्षेपार्ह रील तत्काळ इन्स्टाग्राम वरुन काढून टाकावे. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय भविष्यात महामंडळाच्या बस सेवेबाबत कोणतेही फोटो/ व्हिडिओ/ रील किंवा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये.

आपणांस सदर नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे 411037 येथे सादर करावा. सदरील खुलासा विहित मुदतीत परिवहन महामंडळास सादर न केल्यास तसेच सदर इन्स्टाग्राम वरील रिल हटविण्यात कसूर केल्यास, आपल्याविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!