अंजली दमानियांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; आझाद मैदानातील आंदोलनात उपस्थित केले प्रश्न

मुंबईत सीजेपीच्या ‘तिरंगा मार्च’मध्ये अंजली दमानिया यांनी मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीवरून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप केले आहेत.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 16 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने मुंबईतील आझाद मैदानात 'लेहरा दो तिरंगा मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिली असली तरी, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मार्चमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सहभाग घेतला.

या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना दमानिया यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. राजीव कुमार यांच्यानंतर मार्च २०२४ मध्ये ज्ञानेश कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे त्यांनी भाषणादरम्यान सांगितले. त्यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगालसह १५ राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र, महाराष्ट्रातील निवडणुकीत सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली. केवळ एका तासात ७६ लाख मतदान वाढल्याचा दावा करत, असाच प्रकार हरियाणातही घडल्याचे दमानिया म्हणाल्या.

या प्रकाराविरोधात एका व्यक्तीने न्यायालयात धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली होती. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी तातडीने सूत्रे हलवून लोकांना सीसीटीव्ही फुटेज मागता येणार नाही, असे नियमबदल करून घेतल्याचा थेट आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

दुसरीकडे, दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमध्येही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली होती. मात्र या 'तिरंगा मार्च'ला पोलिसांची परवानगी नव्हती. तिथे दाखल झालेले अभिजीत दिपके यांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले, ज्यामुळे सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुपारीच पोलिसांनी दिपके यांना कारवाईचा इशारा देत एका नोटीसवर त्यांची स्वाक्षरी घेतली होती.

पोलिसांनी नेहा बोरा यांनाही ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी, अभिजीत आणि नेहा यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली होती. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना झालेल्या अटकेचा निषेध म्हणून हा मार्च काढण्याचे ठरवण्यात आले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आझाद मैदानात कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) वतीने 'लेहरा दो तिरंगा मार्च'चे आयोजन करण्यात आले होते. या मार्चमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सहभाग घेतला होता.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही