बापू तुम्ही लोकांच्या हातातील खेळणं; Ajit Pawar गटाचा श्रीनिवास पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर

Ajit Pawar group letter to Shrinivas Pawar

Ajit Pawar VS Shrinivas Pawar | अजित पवारांचे लहान बंधू श्रीनिवास पवार हे त्यांच्या विरोधात गेले आहेत. अजित पवारांवर ‘नालायक माणूस’ म्हणत टीका केली होती.

वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. कारण आपल्याला पुढची १० वर्षे दुसऱ्याकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही”, असे म्हणत अजित पवारांवर त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती.

यावर आता अजित पवार समर्थांकाकडून ‘सुज्ञ बारामतीकरांचे मत’ नावाने एक पत्र व्हायरल करण्यात आले आहे. श्रीनिवास पवारांना उत्तर देत, त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

Ajit Pawar VS Shrinivas Pawar

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – खोटा सहानुभूतीदार

श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला … पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्करपणे का विसरला आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले, एका बाजूला समाजा प्रति आपण काय तरी देणं लागतो, ह्याकडे डोळाझाक करून, दुसरीकडे मात्र केवळ अजित दादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले.

वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपला व्यवसायामध्ये स्वकर्तुत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटावते, अजितदांदाकडे पाहिले तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात, हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.

बापू तुम्ही बोलताना म्हणाला की, मला पण पवार साहेबांसारखे काका मिळाले पाहिजे होते, पण तुम्ही हे विसरला की फक्त काका मिळून चालत नाही, तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात.

पण आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादाच्या बद्दल जे मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे, अशी शंका उपस्थित होते. कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होता.

बारामतीकर म्हणून असे वाटते की, तुम्ही एकतर अजितदादांना (Ajit Pawar) कायम व्हीलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाला असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वकांक्षापोटी आपण हे पाऊल टाकले असावे.

शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की, आम्ही घोगडं भिजवत ठेवणाऱ्या खोटी सहाभूतीदार लोकांच्या मागे न उभा राहता प्रत्येक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.

….आणि श्रीनिवासबापू (Shrinivas Pawar) आमचं ठरलंय “घड्याळ तेच वेळ नवी”

Shrinivas Pawar : “याच्यासारखा नालायक माणूस नाही”, सख्खा भाऊच अजित पवारांवर संतापला

Baramati Lok Sabha Election 2024 : भाऊ श्रीनिवास पवार यांना अजित पवारांवर केलेल्या टीकेला पत्रातून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.