अजित पवारांना मोठा दणका; पक्षचिन्ह आणि नावाबाबत सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Ajit Pawar VS Sharad Pawar supreme court election commission

Ajit Pawar VS Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला मोठा दिलासा दिला आहे.  शरद पवार गटाच्या पक्षाचं चिन्ह आणि नावाच्या मुद्द्यावरुन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाला तुतारी आणि अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.

राज्यसभेची निवडणूक झाल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळू नये, यासाठी प्रयत्न केले गेले होते. परंतु अजित पवार गटाला फटकारत शरद पवार गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होई पर्यन्त तुतारी चिन्ह देण्यात यावे असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह आगामी लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही देण्यात यावे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला देऊ नये, तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ या पक्षाची नोंदणी करण्यात यावी, असे महत्त्वाचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

भविष्यात प्रचारात शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरणार नाही, असे हमीपत्रही अजित पवार गटाने न्यायालयात जमा केले आहे. याआधी, शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरु नये, असा आदेश देत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले होतं. त्यानंतर आज सुनावणीत शरद पवार यांच्या गटाला दिलासा देण्यात आला.

घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, याबाबत शाश्वती नसल्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणी दरम्यान दिले आहेत. अजित पवार यांना आज जरी घड्याळ चिन्ह दिले असले तरी खटल्याच्या अंतिम निकालात या निर्णयात बदल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, याबाबत शाश्वती नाही.

अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह हे त्यांच्याकडे असल्याचे पब्लिक नोटीस मधून सांगावे लागणार आहे. तसेच अजित पवार गटाला प्रचारात शरद पवार यांचा फोटो किंवा नाव वापरता येणार नाही. घड्याळ चिन्हामुळे संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार यांना हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पब्लिक नोटीस द्यावी लागणार आहे.

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या युक्तिवादामध्ये म्हटले की, अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी देऊ नये. लोकसभा निवडणुकीपर्यंत घड्याळ चिन्ह गोठवावे. अन्यथा ग्रामीण भागातील जनतेला घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचेच आहे, असे वाटेल. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कायम ठेवले.

Ajit Pawar VS Sharad Pawar | Supreme Court | Election Commission

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला होता. निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या आधारावर अजित पवार यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. तसेच अजित पवार यांचा गट हाच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अशी मान्यता निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेला होता आज त्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.