Rohit Sharma मुंबई इंडियन्स साठी खेळणार की नाही सर्वकाही झाले स्पष्ट

Rohit Sharma Will Finally Join The Mumbai Indians Team The Franchise Tweeted And Confirm

Rohit Sharma IPL 2024  | IPL चा 17 वा हंगाम 22 मार्चला सुरु होणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला होता. सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि  गुजरात टायटन्स ( Gujarat Titans )  मध्ये झालेला दिसून आला.

मुंबई इंडियन्सने Rohit Sharma ला कर्णधार पदावरून काढल्यानंतर हार्दिक पंड्याला आपल्या संघात सामील करुन कर्णधार पद दिले होते. हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबई इंडियन्सने फॅन्स नाराज झाले होते.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असूनही रोहित सरावात टीम सोबत आला नव्हता. त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स कडून खेळणार कि नाही अश्या चर्चा रंगल्या होत्या. फॅन्स याचा संदर्भ थेट रोहित शर्माचं कर्णधारपदाशी जुळवत होते.

जखमी सूर्यकुमार यादव सोडला तर मुंबई इंडियन्सचे सर्वच खेळाडू सराव करत आहेत. पण रोहित शर्मा फिट अँड फाईन असूनही मुंबई इंडियन्सनच्या कॅम्पपासून दूर आहे.

पण आता चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे, मुंबई इँडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट करत रोहित संघासोबत असल्याचं सांगितलं आहे. मुंबई इंडियन्सच्या व्हिडीओ मध्ये, ”वो आ रहा है..कौन..अरे वो जो गार्डनमें घुमने नहीं देता. पर मै तो घुमेगा..अरे भाई ज्यादा हिरो मत बन..अरे वो आ रहा है..हा..पूल शॉट का मास्टर..मुंबई का राजा..अरे मेरे को क्या दिखा रहा है, उसको दिखा..”

Rohit Sharma IPL Stats Vs Hardik Pandya IPL Stats

रोहितने ( Rohit Sharma ) २४३ सामन्यात ६२११ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक, ४२ अर्धशतके, ५५४ चौकार आणि २५७ षटकार आहेत. रोहितने IPL मध्ये १५ विकेट घेतल्या आहेत.

हार्दिकने १२३ सामन्यात २३०९ धावा केल्या आहेत. त्यात शून्य शतक, १० अर्धशतके, १७२ चौकार आणि १२५ षटकार आहेत. गोलंदाजीमध्ये हार्दिकने मोठी कामगिरी केलेली नाही आहे. त्याने १२३ सामन्यात ५३ विकेट घेतल्या आहेत. आकड्यावरून लक्षात येते रोहित शर्माची ( Rohit Sharma ) कामगिरी हार्दिक पंड्या पेक्षा चांगली आहे.

रोहित शर्मा मुंबईचा सर्वात यशस्वी कर्णधार 

रोहित ( Rohit Sharma ) 2011 पासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळतो आहे. तसेच 2013 पासून तो संघाचा कर्णधार आहे. रोहितच्या ( Rohit Sharma ) नेतृत्वात मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.

रोहितने १६३ सामन्यांमध्ये MI चे नेतृत्व करताना ९१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६८ सामने गमावले असून ४ सामने बरोबरीत सुटले आहेत.

Mumbai Indians Team

  • यष्टिरक्षक : इशान किशन, विष्णू विनोद.
  • फलंदाज: रोहित शर्मा, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, देवाल्ड ब्रेविस
  • अष्टपैलू: हार्दिक पांड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड , नेहल वढेरा, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद नबी , शिवालिक शर्मा, नमन धीर.
  • गोलंदाज: जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, पियुष चावला, दिलशान मदुशंका, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाळ

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.