IPL 2024 | रोहित शर्माबद्दल विचारलेल्या प्रश्नावर हार्दिक पांड्याची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

Why Rohit Sharma isn't leading Mumbai Indians? Forget Mark Boucher, even Hardik Pandya looks clueless

IPL 2024 | आयपीलच्या सतराव्या हंगामात रोहित शर्मा फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे. IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians ) ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी पत्रकार परिषदेत घेतली.

Why Rohit Sharma isn’t leading Mumbai Indians in IPL 2024?

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले की, असे काय कारण होते, ज्यामुळे संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नावर हार्दिक पांड्याने मौन बाळगले. Mumbai Indians चे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माईक उचलला परंतु त्यांनी सुद्धा या प्रश्नाचे उत्तर दिले नाही, नकारार्थी मान करत पूढचा प्रश्न विचारण्यास सांगितले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कर्णधारपद मिळण्याची हमी मिळाल्यानंतरच हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याचा दावा अनेकांनी केला आहे, यावर हार्दिकला पश्न विचारला परंतु त्याने या प्रश्नाचे सुद्धा उत्तर दिले नाही. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने २०२२ साली IPL ट्राॅफीवर आपले नाव कोरले आहे तर मागील हंगामात संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात तो यशस्वी झाला होता.

माध्यमांशी संवाद साधताना हार्दिक म्हणाला, ‘आता काही वेगळे घडणार नाही कारण मला काही मदत लागली तर रोहित माझ्यासोबत नेहमी असेल. तसेच, तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाखाली जे काही मिळवल आहे ते मला पुढे घेवून जायचे आहे. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्यांच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. मला माहित आहे की संपूर्ण हंगामात त्याचा नेहमीच माझ्या खांद्यावर हात असेल.

IPL 2024 च्या सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोर या संघांमध्ये २२ मार्चला एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे खेळला जाणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्ससोबत नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.