‘मनातील मुख्यमंत्री…’; राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये झळकले लक्षवेधी बॅनर्स

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कल्याण दौऱ्यानिमित्त त्यांना ‘मनातील मुख्यमंत्री’ संबोधणारे बॅनर्स लावण्यात आले असून, परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Published On: 

Raj Thackeray announced two candidates for assembly elections

प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कल्याण-डोंबिवलीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली असून, यात त्यांना ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे संबोधण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

राज ठाकरे यांनी काल डोंबिवलीतील प्रगती कॉलेजमध्ये नवनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत संघटनात्मक कामकाज, आगामी कार्यक्रम आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

आज सकाळी १० वाजता कल्याणमध्ये राज ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक कल्याण नगरीत स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवर ‘मराठी हृदयसम्राट, तुम्ही राजा होता, तुम्ही राजा आहात अन् राजाच राहणार’ तसेच ‘महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब ठाकरे’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे संपूर्ण परिसरात राज ठाकरे यांच्या दौऱ्याचीच चर्चा रंगली आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच्या या बैठकांमुळे स्थानिक स्तरावर मनसेच्या संघटनात्मक बळकटीकरणाला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही