छत्रपती संभाजीनगर हादरलं! रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला, जिन्सी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा परिसरात रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी ४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

प्रतिनिधी, २९ नोव्हेंबर: छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या २ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किराडपुरा चौकातील डीपीजवळ हा खळबळजनक प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाचा पाठलाग केला. हा तरुण एका पत्र्याच्या कंपाउंड शेडमध्ये जाऊन लपला. यावेळी पोलिसांनी त्याला आपले ओळखपत्र दाखवून आपण पोलीस असल्याचे स्पष्ट केले.

पोलिसांनी आपली ओळख पटवून दिल्यानंतरही संबंधित संशयित आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींनी मिळून पोलिसांवर लोखंडी रॉडसारखी वस्तू, लाकडी दांडा आणि दगडांनी जोरदार हल्ला केला.

या गंभीर प्रकारानंतर पोलीस हवालदार संजय गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे जिन्सी पोलीस ठाण्यात ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, या घटनेमुळे शहरातील पोलिसांच्या सुरक्षिततेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही