टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो यात गैर काय? व्हायरल व्हिडिओवर भाजप नेत्याचा सवाल

भाजपचा टिपू सुलतान जयंतीला विरोध असताना धाराशिवचे भाजप नगरसेवक विलास लोंढे यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली, ज्यानंतर त्यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिले आहे.

Published On: 

BJP corporator Vilas Londhe context image regarding Tipu Sultan Jayanti

धाराशिव, 22 नोव्हेंबर: राज्यात टिपू सुलतान जयंतीवरून भाजप आणि हिंदू संघटनांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. काही नेत्यांनी तर जयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, धाराशिवमध्ये भाजपचेच नगरसेवक विलास लोंढे यांनी टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे समोर आले आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या वादानंतर विलास लोंढे यांनी स्वतः समोर येत आपली बाजू स्पष्ट केली आहे. “टिपू सुलतान जयंतीला उपस्थित राहिलो, यात गैर काय?” असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. टिपू सुलतान चौक हा त्यांच्याच प्रभागात येत असल्याने तिथे उपस्थित राहणे हे आपले कर्तव्य होते, असे लोंढे यांनी म्हटले आहे. आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केल्याची स्पष्ट कबुलीही त्यांनी दिली.

आपण भाजपचे कार्यकर्ते असून पक्षाच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यप्रणालीनुसारच काम करत असल्याचे लोंढे यांनी सांगितले. सर्वधर्मसमभाव मानूनच आपण या जयंतीला गेलो होतो, त्यामुळे आपल्या सहभागावरून जातीय किंवा धार्मिक मतभेद निर्माण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सुनावले.

टिपू सुलतान यांच्या जयंतीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही वाद नाही, मात्र त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे खरा वाद निर्माण झाल्याचे लोंढे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, भारतीय संविधानातील चित्रांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, संविधानात टिपू सुलतान यांचा फोटो झाशीच्या राणीच्या बाजूला आहे, त्यामुळे यावरून विनाकारण मतभेद निर्माण करू नयेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही