दुष्काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कृषी विभागाकडून ज्वारी, हरभऱ्याचे मोफत बियाणे, असा करा अर्ज

पुणे जिल्हा कृषी विभागाने दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारी आणि हरभरा पिकांच्या बियाण्यांचे मोफत वाटप सुरू केले आहे.

Published On: 

Shetkari Karjamukti Yojana: 94,000 farmers ineligible.

पुणे, 21 नोव्हेंबर: महाराष्ट्रात दुष्काळामुळे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ‘फुले यशोमती’ या ज्वारीच्या वाणाचे मोफत बियाणे देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रासाठी हे बियाणे पुरवण्यात आले असून, बहुतांश ठिकाणी याची पेरणीही पूर्ण झाली आहे.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात चारा टंचाई निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामात विहीर, तलाव, कालवा किंवा बोअरवेलचे पाणी उपलब्ध असल्यास तिथे ज्वारीची पेरणी करावी. या पिकाला दोन ते तीन वेळा संरक्षित पाणी दिल्यास धान्यासोबतच जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होऊ शकतो, ज्यामुळे चारा टंचाई कमी होण्यास मदत होईल. याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आणखी १० हजार एकर क्षेत्रासाठी ज्वारीचे मोफत बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत याचे वितरण केले जाणार असून, पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात हरभरा पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणावर होते. हे पीक कमी पाण्यात येत असल्याने यंदा शेतकरी हरभरा लागवडीला पसंती देत आहेत. उसाची तोडणी झाल्यानंतर आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडण्याची शक्यता असलेल्या शेतात उसाचा खोडवा न ठेवता हरभरा घेतल्यास जमिनीचा पोत सुधारण्यास मदत मिळते. यंदा कृषी विभागाने जिल्ह्यातील सुमारे ६ हजार ३२० एकर क्षेत्रासाठी हरभरा बियाण्याचे मोफत वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रमाणित बियाणे’ या ऐवजी ‘मिनी किट’ या घटकांतर्गत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही