Share

पीएम किसान योजना: शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार २४ वा हप्ता, अटी पूर्ण करण्याचे आवाहन

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली असून, ऑक्टोबरमध्ये पैसे मिळण्याची शक्यता आहे.

Published On: 

PM Kisan 23rd Installment Indian farmer checking money status on mobile phone

प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. हा दोन हजार रुपयांचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेचा याआधीचा २३ वा हप्ता जून २०२६ मध्ये देण्यात आला होता. या वितरणाला आता चार महिने पूर्ण झाले असून सरकार लवकरच २४ व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून हप्ता जमा करण्याच्या निश्चित तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

पुढील हप्त्याचा लाभ सुरळीत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच, लाभार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आणि बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सुविधा सक्रिय असणे अनिवार्य आहे.

याव्यतिरिक्त, योजनेचा लाभ पुढेही सुरू राहण्यासाठी अर्जासोबत दिलेली जमिनीची कागदपत्रे अचूक असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करावी. जर अर्जात काही त्रुटी असतील, तर पीएम किसान पोर्टलवर ऑनलाइन किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्रात जाऊन आवश्यक ती दुरुस्ती करता येऊ शकते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा २४ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने अद्याप निश्चित तारखेची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही