सुनेत्रा पवार-देवेंद्र फडणवीसांमध्ये दीड तास चर्चा; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बावनकुळेंचे सूचक भाष्य

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाल्यानंतर, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आणि डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केले.

Published On: 

Chandrashekhar Bawankule commenting on Sunetra Pawar and Devendra Fadnavis meeting.

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज तब्बल दीड तास प्रदीर्घ चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर सूचक भाष्य केले आहे.

या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, “एनडीएचे पार्टनर वाढत असतील तर ते भाजपसाठी चांगले आहे. जास्तीत जास्त लोक एनडीएमध्ये येणे आणि आघाडी मजबूत होणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ही एक सकारात्मक गोष्ट असून, विकसित देशाकरिता आणि पुढच्या विकासासाठी जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे.”

यावेळी बावनकुळे यांनी डिलिमिटेशनच्या (मतदारसंघांची पुनर्रचना) मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली. डिलिमिटेशनला सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे, मात्र काँग्रेसने त्याला विरोध दर्शवला आहे. याविषयी बावनकुळे म्हणाले, “देशातील निवडणुकांसाठी डिलिमिटेशनला पाठिंबा देणे खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहे.”

मोठ्या मतदारसंघांतील अडचणींचा दाखला देताना बावनकुळे म्हणाले, “रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. इतक्या मोठ्या मतदारसंघात काम करणे खासदारासाठीही कठीण जाते. कामठी विधानसभेचा विचार केल्यास तिथे ५.५० लाख मते आहेत. एक आमदार एवढा मोठा मतदारसंघ कसा काय कव्हर करू शकतो?”

मतदारसंघ जेवढा छोटा, तेवढा विकास आणि संपर्क चांगला होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी सरकारमध्ये असल्यास सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे सोपे जाते. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेसाठी डिलिमिटेशनचा कायदा मान्य होणे तसेच महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण महत्त्वाचे असल्याचे बावनकुळे यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, ‘सत्तेसाठी हपापलेले शरद पवार गटातील लोक सत्तेसोबत जात आहेत,’ या काँग्रेसच्या टीकेलाही बावनकुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. “काँग्रेस पार्टी किंचित-किंचित होत चालली आहे. इंडिया आघाडीला आपले मित्रपक्ष सांभाळता येत नाहीत. या आघाडीतील प्रमुख पक्ष असलेला काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व पूर्णपणे विजनलेस आहे,” अशी जोरदार टीका बावनकुळे यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही