प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अंडर १९ आशिया कपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर ३३७ धावांचे भक्कम आव्हान ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा युवा फलंदाज आर्यवीर सेहवागने लक्षवेधी खेळी केली. सामन्यादरम्यान फोरआर्मवर चेंडू लागून जखमी झाल्यानंतरही त्याने मैदान सोडले नाही आणि धैर्याने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानने दिलेल्या ३३७ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग ही सलामीची जोडी मैदानात उतरली. या दोघांनी संघाच्या डावाची आश्वासक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
उत्कृष्ट लयीत खेळत असलेल्या आर्यवीरच्या फोरआर्मवर चेंडू लागल्याने तो वेदनेने विव्हळत होता. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही विकेटवर टिकून राहत त्याने आपला डाव पुढे नेला. आर्यवीरने अवघ्या ६१ चेंडूंमध्ये ९ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
हा सामना टीम इंडियासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही आर्यवीरने कोणतेही सेलिब्रेशन केले नाही. धावसंख्या वाढवण्याकडे त्याने आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. आर्यवीर बाद झाल्यानंतर विके विनिथ मैदानात आला असून तो सध्या कर्णधार लक्ष्य रायचंदानीला साथ देत आहे. यादरम्यान भारतीय संघाने १०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटची आठवण आली; आर. अश्विनची मोठी कबुली
- गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मते चोरली; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
- सूर्यकुमार यादवचं दणदणीत कमबॅक! १५ चेंडूत अर्धशतक झळकावत श्रेयस अय्यरला दिला धोक्याचा इशारा








