सतेज पाटलांना कायद्यानेच वेसण घालणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा, खासगी शिक्षण संस्थांसाठी मार्चमध्ये कायदा

सतेज पाटील यांना कायद्यानेच वेसण घालणार असून, खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी मार्चमध्ये एफआरए कायदा आणणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.

Published On: 

Chandrakant Patil speaking about FRA law and Satej Patil

मुंबई, 13 नोव्हेंबर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरु असलेला संघर्ष आता राज्याच्या राजकारणातही तापला आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला असून, त्यांना कायद्यानेच वेसण घालणार असल्याचा इशारा दिला आहे. तसेच खासगी शिक्षण संस्थांच्या मनमानी फी वसुलीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोललेले आपण खपवून घेणार नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास सतेज पाटलांचे साम्राज्य अवघ्या पाच मिनिटांत उद्ध्वस्त करू, या आपल्या जुन्या वक्तव्याचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचा संचालक बसल्यानंतर त्यांनी सतेज पाटलांवर ही जाहीर टीका केली होती.

शिक्षण संस्थाचालकांची झोप आपण नाही तर सुप्रीम कोर्टाने उडवली असल्याचे पाटील यांनी सांगितले. एका विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने मोठी प्रश्नावली दिली असून, दिवाळीनंतर त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठ चालकांची झोप नक्की उडणार आहे. याव्यतिरिक्त, एफआरए (FRA) कायद्याची अंमलबजावणी रोखण्यासाठी सतेज पाटील मुख्यमंत्र्यांना सातत्याने भेटत असल्याचा दावाही त्यांनी केला.

येत्या मार्च महिन्यात सरकार एफआरए कायदा आणणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर सरकारचे नियंत्रण राहील आणि मनमानी वसुली करणाऱ्यांवर कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, डी. वाय. पाटील महाविद्यालयाचा सातबारा तपासा, तो कोणाच्या नावावर आहे हे समोर येईल, असा सूचक इशाराही त्यांनी सतेज पाटलांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही