प्रतिनिधी, 12 नोव्हेंबर: पाकिस्तानच्या वायव्य भागात असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या गोळीबारात एका डीएसपीसह ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांचे हे पथक अवैध सोन्याच्या खाणकामाविरोधात छापा टाकण्यासाठी जात असताना ही घटना घडली. कोहाट आणि करक जिल्ह्यांच्या दरम्यान असलेल्या दरबोकाच जालंधर बांदा परिसरात दबा धरून बसलेल्या बंदूकधाऱ्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांची पाच वाहने जाळून टाकली. कोहाट पोलिसांचे प्रवक्ते मोहम्मद नौमान जेब यांनी या हल्ल्यात ११ पोलीस ठार आणि १२ जण जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, हल्लेखोरांची ओळख आणि त्यांच्या संख्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
या भीषण घटनेमुळे खैबर पख्तुनख्वा भागात खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.
गेल्या काही महिन्यांत या प्रदेशात पोलीस आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. ‘आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा’च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानात २०२२ मध्ये ६५८ दहशतवादी हल्ल्यांची नोंद झाली होती. तर २०२५ मध्ये ही संख्या जवळपास चौपट वाढून २४२५ वर पोहोचली आहे. यावरून पाकिस्तानसमोरील सुरक्षा आव्हाने अधिक गंभीर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार; आदिवासी योजनांचीही दिली माहिती
- इंग्लंड संघात दोन मोठे बदल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून जेकब बेथेल आणि जोश टंग बाहेर
- विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनेत्रा पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाल्या, ‘जशी वेळ येईल तशा…’
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








