नवी मुंबई: नाकाबंदीत पोलिसाला कारने उडवले, बोनेटवरून २०० मीटर फरफटत नेले; गाडीची नंबर प्लेट बनावट

कळंबोली येथे नाकाबंदी दरम्यान एका कारने पोलिसाला धडक देऊन २०० मीटर फरफटत नेले. या कारची नंबर प्लेट बनावट असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Published On: 

Violent clash between two groups in Majalgaon Beed

नवी मुंबई, 11 नोव्हेंबर: नवी मुंबईतील कळंबोली परिसरात नाकाबंदी दरम्यान एका भीषण घटनेची नोंद झाली आहे. वाहनांची तपासणी करत असताना एका भरधाव कारने थेट पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. यानंतर चालकाने गाडी न थांबवता या कर्मचाऱ्याला बोनेटवरून तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि तेथून पळ काढला.

कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप भोई हे संशयित वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एक स्विफ्ट डिझायर गाडी वेगाने तेथे आली. भोई यांनी चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने न जुमानता गाडी पुढे नेली. यामुळे भोई कारच्या बोनेटवर फेकले गेले. तरीही चालकाने गाडी न थांबवता त्यांना तसेच फरफटत नेले.

या थरारक आणि भयानक घटनेत कॉन्स्टेबल दिलीप भोई हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

पसार झालेल्या या स्विफ्ट डिझायर कारबाबत प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडीला असलेली नंबर प्लेट पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले आहे. तसेच, या कारमध्ये दोन व्यक्ती बसल्या असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. बनावट नंबर प्लेट आणि गाडीतील व्यक्तींचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काही संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही