अहिल्यानगर, 11 नोव्हेंबर: अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही कोणत्याही निर्णयाविना पार पडली. या बैठकीला अवघे दोन ते तीन साखर कारखान्यांचे चेअरमन उपस्थित राहिल्याने हा तिढा कायम राहिला आहे.
उद्या सायंकाळपर्यंत ऊसदर निश्चित करण्याच्या स्पष्ट सूचना पालकमंत्री विखे यांनी कारखान्यांच्या चेअरमनना दिल्या आहेत. सध्या साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्यामुळे जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून दराबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राधाकृष्ण विखे यांनी दिली.
दुसरीकडे, बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने ऊस उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. उद्या सायंकाळपर्यंत ऊसदराचा निर्णय न झाल्यास उसाचे काटे, साखर कारखाने आणि जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग बंद पाडण्याचा थेट इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हवामान विभागाचे नवे अपडेट: महाराष्ट्रासाठी २४ तास महत्त्वाचे, राज्यात थंडीचा कडाका वाढणार
- यशस्वी जयस्वालच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सची मोठी मागणी; लखनौकडे मागितले मोहम्मद शमी आणि मोहसीन खान
- फिटनेसच्या अटीवर मिचेल स्टार्क आयपीएल २०२७ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








