मुंबई, 12 नोव्हेंबर: अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) प्रमुख तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई सणासुदीच्या काळातही सुरूच आहे. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत कारवाईचा वेग वाढवला असून, स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका तपासणीत गंभीर अस्वच्छता, उंदरांचा प्रादुर्भाव आणि अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आढळल्याने एका अन्न व्यावसायिकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी मुंढे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका हॉटेलच्या कॅन्टीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी ‘झिरो कॉम्प्रोमाईज, तडजोड नाही’ असे कॅप्शन दिले आहे. अन्नसुरक्षा हा पर्याय नसून नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले. तसेच, व्यावसायिक हितापेक्षा ग्राहकांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असून असुरक्षित आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भेसळ रोखण्यासाठी एफडीएने जोरदार मोहीम उघडली आहे. यापूर्वी मुंढे यांनी ॲनलॉग पनीर आणि चायनीज पदार्थांमधील कृत्रिम रंगांवर कारवाईचा बडगा उगारला होता, ज्यामुळे अनेक ठिकाणच्या चायनीज हॉटेल्समधील अन्नातून लाल रंग गायब झाल्याचे चित्र आहे. याशिवाय, दिवाळीच्या आधी काजू कतलीवर लावण्यात आलेला चांदीचा वर्ख खरा आहे की ॲल्युमिनियम फॉईल, हे ओळखण्याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार; आदिवासी योजनांचीही दिली माहिती
- इंग्लंड संघात दोन मोठे बदल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून जेकब बेथेल आणि जोश टंग बाहेर
- विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनेत्रा पवारांचे सूचक वक्तव्य; म्हणाल्या, ‘जशी वेळ येईल तशा…’
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






