गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल

गोकुळ दूध संघातील नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यामागे पुण्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप करत विवेकानंद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनाही सवाल केला आहे.

Published On: 

Vivekanand Patil protesting against Gokul Dudh Sangh nominated members voting rights

प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघातील नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्द्यावरून युवा नेते विवेकानंद पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण षडयंत्रामागे पुण्यातील एका मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, ‘आम्हाला यात पडायचे नाही’ असे सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एका रात्रीत अध्यादेश कसा काढला, असा थेट सवाल उपस्थित केला आहे.

नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देणे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. निवडून आलेल्या चेअरमनला या सदस्यांच्या माध्यमातून ‘चोरमन’ बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या सदस्यांना त्यांनी ‘गोकुळवरती डोळा ठेवलेली मांजरं’ अशी उपमा दिली आहे.

शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्या पुण्यातील त्या मंत्र्याला पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. ‘त्यांना खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल, तर त्यांनी आमच्या गोट्यातील मारक्या गाईची धार काढून दाखवावी,’ असे ते म्हणाले.

या निर्णयाच्या माध्यमातून गोकुळमध्ये मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या हितासाठी या कटाचा सर्वांनी संघटितपणे विरोध करण्याचे आवाहन विवेकानंद पाटील यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही