कलम ३७० आणि राम मंदिराला विरोध करणारे देशविरोधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली असून राम मंदिर आणि कलम ३७० ला विरोध करणारे देशविरोधी असल्याचा घणाघात त्यांनी केला.

Published On: 

Eknath Shinde on Shivsena symbol

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राम मंदिर उभारणी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यास विरोध करणारे देशविरोधी असून ते देश तोडण्याचं काम करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आणि त्यांच्या विकासात्मक कामांचं शिंदे यांनी यावेळी तोंडभरून कौतुक केलं.

पंतप्रधान मोदींनीच काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचं धाडस दाखवलं. यातून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा ठळक संदेश जगाला गेल्याचे शिंदे यांनी नमूद केले. मोदींना ‘विकास पुरुष’ संबोधत, विरोधकांकडून पसरवण्यात येणारे ‘फेक नरेटिव्ह’ आणि गोबेल्स नीती मोडून काढण्याचं आवाहन त्यांनी केलं.

राज्याच्या विकासासाठी केंद्रातून मिळणाऱ्या निधीबाबत बोलताना शिंदे यांनी यूपीए आणि एनडीए सरकारची तुलना केली. यूपीए सरकारच्या १२ वर्षांच्या काळात महाराष्ट्राला केवळ २ लाख कोटी रुपये मिळाले होते; मात्र, मोदी सरकारने राज्याच्या विकासासाठी तब्बल १५ लाख कोटी रुपयांचा भरघोस निधी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधक केवळ विकासाच्या कामात अडथळे आणत असून लोकशाही धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. देशातील युवाशक्तीने पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, असे आवाहन करत ‘डबल इंजिन’ सरकारमुळे विकासाची गती कधीच थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही