प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते नवनाथ बन यांना एका ट्वीटद्वारे पुन्हा एकदा डिवचले आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका उपहासात्मक कार्टूनमुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
धंगेकर यांनी पोस्ट केलेल्या या कार्टूनमध्ये भाजप कार्यालयाबाहेर एका कुत्र्याला खाण्यासाठी पाव दिला जात असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. हे कार्टून शेअर करत त्यांनी “ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला”, अशी खोचक टीका केली आहे.
यासोबतच धंगेकरांनी बन यांना उद्देशून अत्यंत तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. “अरे बेट्या तुझे मालक लोक पण वाकड्यात जात नाहीत आमच्या, कधी तुझी नसबंदी होईल कळणार सुद्धा नाही तुला,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या ट्वीटद्वारे रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांना स्पष्टपणे आव्हान दिले असून, राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह केल्याने आल्या चर्चेत
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








