मराठी अभिनेता अभिजीत केळकरची धक्कादायक फेसबुक पोस्ट; जीवाला धोका असल्याचे सांगत फडणवीस-शिंदेंकडे मागितली मदत

अभिनेता अभिजीत केळकरने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला असून, मालाडमधील घरांच्या प्रश्नावर फडणवीस आणि शिंदेंकडे मदत मागितली आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 1 नोव्हेंबर: प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. मालाड येथील चाळीतील घरे जमीनदोस्त करण्याचा घाट काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घालत असल्याचा आरोप त्याने केला आहे. या गंभीर प्रकरणात त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.

मालाड पूर्व परिसरातील पुष्पापार्क आणि बाणडोंगरी या भागात आपली वडिलोपार्जित घरे असल्याचे अभिजीतने नमूद केले आहे. आपल्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आणि काडी-काडी जमवून हा संसार उभा केल्याचे तो म्हणाला. याला कोणी झोपडपट्टी म्हणत असले तरी, गरिबांचे छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

बिल्डरांच्या पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी हे सर्व नियंत्रित करत असून व्यवस्थेला हातावर खेळवत असल्याचा आरोप केळकरने केला आहे. कोणताही करार न करता आणि कागदपत्रे न दाखवता घरे पाडली जात आहेत. तसेच लोकांना धमक्या देण्यासाठी गुंड पाठवले जात असल्याचा दावाही त्याने केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण हा प्रकार पाहत असल्याचे तो म्हणाला.

सध्या कोणालाही बदनाम करायचे नसल्याने आपण नावे घेणार नाही, मात्र वेळ आल्यावर नावे घ्यावीच लागतील, असा इशारा त्याने दिला आहे. “मी कोणाला घाबरत नाही, पण माझ्या जीवाला धोका आहे. घरी आई, बायको, मुलांना सांगून मी निघालोय,” अशी भीती त्याने व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मनात नितांत आदर असला तरी येथे ‘दिव्याखाली अंधार’ असल्याची खंत व्यक्त करत, हक्काची घरे आणि न्यायासाठी त्याने मदतीचे आवाहन केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही