छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर: एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या कार्यालयात आढळून आले आहे. तुम्हाला कोणत्याही क्षणी मारले जाऊ शकते, असा गंभीर इशारा या पत्रात देण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या धमकीच्या पत्रात काही धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. जलील यांच्या हत्येची सुपारी अहिल्यानगर येथील एका तरुणाला देण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, या पत्रात संबंधित तरुणाचे नाव आणि सविस्तर पत्ताही नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
इम्तियाज जलील यांनी हे पत्र तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. पत्रातील दाव्यांची सत्यता तपासावी आणि त्यात उल्लेख असलेल्या अहिल्यानगरमधील व्यक्तीची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानुसार पोलीस आता पत्रामागील नेमके कारण, माहितीची विश्वासार्हता आणि संबंधित तरुणाचा खरोखरच याच्याशी काही संबंध आहे का, याचा शोध घेत आहेत.
या प्रकरणावर बोलताना जलील यांनी सांगितले की, यापूर्वीही आपल्याला अनेकदा अशा धमक्या मिळाल्या आहेत आणि आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र, या घटनेच्या निमित्ताने त्यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. शहरात गावठी कट्टे आणि बंदुका खुलेआम आणल्या जात असून, भररस्त्यात हत्या होत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप जलील यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- स्मृती मंधानाचा खुलासा: वर्ल्ड कप विजयानंतर धोनीने पाठवला होता खास व्हॉट्सॲप मेसेज
- शेतकऱ्यांबाबतच्या विधानावरून एकनाथ शिंदे संतापले; आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
- “तुझी लायकी किती तू बोलतो किती!” नवनाथ बन यांच्या आरोपांनंतर निलेश राणे आक्रमक; महायुतीत वाद
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








