‘बारा पक्ष फिरलेला माकडछाप’; भाजप नेते नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर एकेरी शब्दांत हल्लाबोल

पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजप नेते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांवर एकेरी शब्दांत जोरदार टीका करत त्यांना ‘माकडछाप’ म्हटले आहे.

Published On: 

BJP leader Navnath Ban criticizes Ravindra Dhangekar

प्रतिनिधी, 31 ऑक्टोबर: विधानपरिषदेच्या निकालानंतर महायुतीमध्ये निर्माण झालेला वाद आता शिगेला पोहोचला आहे. पुण्यातील पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी शुक्रवारी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर एकेरी भाषेत अत्यंत खोचक शब्दांत हल्लाबोल केला. धंगेकरांना ‘बारा पक्ष फिरलेला माकडछाप’ म्हणत त्यांनी (Navnath Ban) जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

काल नवनाथ बन यांनी विधानपरिषदेतील भाजपच्या पराभवाचे खापर शिंदे गटावर फोडले होते. रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेमुळेच भाजपला फटका बसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, आज बन यांनी धंगेकरांवर पुन्हा एकदा जहरी शब्दांत निशाणा साधला.

धंगेकरांवर टीका करताना बन म्हणाले, “ज्यांना एका पक्षात करिअर करणे जमले नाही, त्यांनी १२ पक्ष फिरून शिवसेनेत प्रवेश केला. हा माकडछाप व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि माझ्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करत आहे.” पुणेकरांनी आणि विधानसभेनेही या ‘माकडछाप ब्रँड’च्या व्यक्तीला घरी बसवल्याचे बन यांनी म्हटले. तसेच, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत धंगेकरांच्या कुटुंबातील दोघांचे, विशेषतः मुलाचे डिपॉझिट जप्त झाल्याची आठवण करून देत, अशा व्यक्तीने भाजपला शहाणपण शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला. “माकडाच्या हाती कोलीत अशी त्यांची अवस्था असून, बारा घरी धुणीभांडी करूनही ते आपले करिअर सेट करू शकले नाहीत,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

स्वतःच्या राजकीय प्रवासाची तुलना करताना बन म्हणाले की, त्यांच्या पाठीशी भाजपचे ‘कमळ’ आहे. मात्र धंगेकरांच्या मागे ‘पंजा’, ‘रेल्वे इंजिन’, ‘धनुष्यबाण’ आणि उद्या ‘शिटी’ येईल. “कधी काँग्रेस, कधी मनसे तर कधी शिवसेना असा प्रवास करणारे उद्या उबाठामध्येही जातील. तुला उद्या एकाही पक्षात कुणी किंमत दिली नाही,” अशा एकेरी शब्दांत बन यांनी सुनावले. आपण १२ वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केले, त्यानंतर पत्रकारिता करून आता भाजपचे कमळ हातात घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. करिअर सेट न झाल्यानेच धंगेकर माकडासारख्या उड्या मारत असून, अशा माकडछाप व्यक्तीकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन नवनाथ बन यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही