मुंबई, 30 ऑक्टोबर: मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात एका ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त राजकीय कटुता विसरून दिग्गज नेते एकाच मंचावर आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
या सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती आणि संवादाच्या वारशावर भाष्य केले. एका अग्रलेखापेक्षा व्यंगचित्रामध्ये राजकीय परिस्थिती अचूक मांडण्याची व सत्ताधाऱ्यांना फटकारण्याची मोठी ताकद असते, असे सांगत त्यांनी नेपोलियन बोनापार्टच्या एका प्रसिद्ध व्यंगचित्राचा ऐतिहासिक दाखला दिला. तसेच, राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे हीच महाराष्ट्राची परंपरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याच मंचावरून फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज व्यंगचित्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक भव्य कलादालन (Art Gallery) उभारण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- वोडका पिऊन किसिंग सीन शूट केला; अभिनेत्री नायरा बॅनर्जीचा धक्कादायक खुलासा
- गोकुळ निवडणुकीत समांतर सभेचा थरार; ‘तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?’, सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार
- सणासुदीत भेसळ करणाऱ्यांची खैर नाही; तुकाराम मुंढेंची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा, १९ कोटींचे मसाले जप्त
Quick Answers
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज व्यंगचित्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक भव्य कलादालन (Art Gallery) उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








